धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहकार्याने मोफत आयोध्या दर्शन (गडचिरोलीतून 400 भाविक रवाना)

296

गडचिरोली, 28 फेब्रुवारी

रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर ठिकठिकाणाहून भाविक प्रभू श्रीरामाच्या दर्शनाकरीता आयोध्येत दाखल होत आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविकांना इच्छा असूनही आयोध्येत जाता आले नाही. या भाविकांसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहकार्याने मोफत अयोध्या दर्शनाची सोय करून देण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 400 भाविक आज अयोध्येकडे रवाना झाले असून ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी या भाविकांसाठी 10 बसेसची मोफत व्यवस्था केली. आज सकाळी या बसेस भाविकांना घेऊन अयोध्येकडे निघाले आहेत. भाविकांसाठी मोफत बसेसची व्यवस्था केल्याने त्यांनी यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांचे आभारही व्यक्त केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगीतल्या जात आहे.