पोलिसांनी ३ बैलगाड्या, दारूसह जप्त केला ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल

288

गडचिरोली,ता. २८ : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील टेकडा (ताला) येथील दारूतस्करांनी बैलगाड्यांनी दारूतस्करीचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर कारवाई करत तीन बैलगाड्या व दारूसाठ्यासह ४ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल २७ फेब्रुवारीला जप्त केला.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने टेकडा (ताला) येथील दारूतस्कर संदीप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारूची आयात करुन बैलगाडीच्या माध्यमातुन वाहतूक करणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीबाबत तत्काळ वरीष्ठांना माहिती देऊन त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक गडचिरोली येथून रवाना करण्यात आले. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टेकडा गावालगतच्या नदी परीसरात सापळा रचून त्याच्या दिशेने येणा­ऱ्या तीन बैलगाड्या व पोलिसांचा कानोसा घेण्याकरिता वापरण्यात आलेल्या दुचाकीला ताब्यात घेऊन पाहणी केली असता तिनही बैलगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिअर व व्हिस्की असा विदेशी दारूचा मोठा साठा दिसून आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईदरम्यान पोलिस पथकाने ५० बॉक्समधील २ लाख ५२ हजार रुपये किमतीचा विदेशी दारू साठा जप्त केला. तसेच दारू तस्करीकरिता वापरण्यात आलेल्या ३ बैलगाड्या व इतर १ लाख ७० हजार रुपये असा एकूण ४ लाख २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मोक्यावर जप्त करण्यात आला. तसेच बामणी उप पोलिस स्टेशन येथे संदीप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापू मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम सर्व रा. टेकडा (ताला) या चार आरोपींना जेरबंद करून गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन)कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार अकबर पोयाम, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, चालक पोलिस नायक दीपक लोणारे यांनी केलेली आह ख