जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेत पालक मेळावा

480
  1. गडचिरोली, ता. ५ : स्थानिक रामनगर येथील नगर परिषदेद्वारे संचालित जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने गोंडवाना कला दालनात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
  2. या मेळाव्यात नर्सरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. पालकांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही सूचना मांडल्या. पालकांनी मांडलेल्या सूचना व समस्यांवर उत्तर देताना शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांनी पुढील शैक्षणिक सत्रात शाळेत राबवले जाणारे उपक्रम, परीक्षा पद्धत प्रवेश प्रक्रिया PMSHR I शाळेची संकल्पना, शालेय परीसराची स्वच्छतेत पालकांची भूमिका, पालक स्वतः मध्ये बदल करून आपल्या पाल्यात कसे बदल घडवू शकतात, संगणक शिक्षण, स्मार्ट ओळखपत्र आदीबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.
  3. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांनी आपापल्या परीचय देऊन पालकांना आपली ओळख करून दिली.पालक मेळाव्याचे औचित्य साधून शाळा समितीचे सदस्य मधुकर नैताम व मुमताज सहारे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडताना आपली वाहने योग्य पद्धतीने लावावी, शाळा ही तंबाखूमुक्त असल्याने शालेय परिसरात तंबाखुयुक्त पदार्थांचे सेवन करू नये, परिसरात कुठेही प्लास्टिक टाकू नये, असे आवाहन शामदेव महागणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सतीश विधाते, राजू शेरकी, मधुकर नैताम, मुमताज सहारे, रंजना मडावी, दिपाली धोटे , स्वाती चापले, वर्षा जब्बालवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन व आभार महेंद्र शेडमाके यांनी मानले.