पश्चिम बंगाल येथील संदेशखाली मध्ये होणाऱ्या महिलांवरच्या अत्याचाराविरोधात अहेरी जिल्हा

293
  • गडचिरोली :

अहेरी जिल्हा महिला समन्वय समिती मातृशक्ती संघटन तर्फे पश्चिम बंगाल येथील संदेश खाली मध्ये होणाऱ्या महिलांवरच्या अत्याचारा विरोधात कठोर कारवाई होण्यासाठी तहसीलदार अहेरी यांना निषेध निवेदन सादर केले.

पश्चिम बंगाल हे राज्य आता अराजकता कडे वाटचाल करताना दिसत आहे. पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्ज हजारो नवे लाखो बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना आधार कार्ड नोकऱ्या देऊन त्यांचा वापर स्थानिक हिंदू नागरिकांच्या वर गुंडगिरी साठी होत आहे. अधिकारी त्यांच्या घरावर छापे मारण्यासाठी गेले असता हजारो रोहिंग्या अधिकाऱ्यांवरच हल्ले केले. पश्चिम बंगालमधील राजवटीची वाटचाल ही देशाला अधोगतीकडे नेणारी आहे त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये या घटनेवर कठोर कारवाई करण्यात यावी व महिलांना न्याय देण्यात यावा व केंद्र सरकारने लवकरात लवकर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी आग्रही मागणी महिला समन्वय समिती मातृशक्ती संघटन अहेरी जिल्हा यांनी सदर निषेध निवेदन मध्ये केले.यावेळी मोठ्या प्रमाणात मातृशक्ती उपस्थित होत्या.