रूढी परंपरा लुप्त होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे- राजे अम्ब्रिशराव आत्राम

267

टेकमपल्ली येथे विविध कार्यक्रम संपन्न.

गडचिरोली:

आदिवासी समाजाच्या रूढी- परंपरा आणि कला जपणे गरजेचे आहे.नाहीतर या कालांतराने लुप्त होतील आणि नवीन पिढीला त्याची माहिती मिळणार नाही. यासाठी या रुढी परंपरा लुप्त होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी येथे केले.ते टेकमपल्ली येथील सप्तरंगी ध्वजारोहण व सल्लागांगरा शक्ति ठाना,मुठवा पाहांदी कुपार लिंगो,विर बाबुराव पुल्लेश्वर सेडमाके पुतळ्याचे अनावरण प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुंदरशाह सडमेक भुमक अहेरी,दादराम कुसराम भुमक भामरागड,गजानन पोरतेट भुमक हेमलकसा,राहुल कन्नाके कोयपूनेम प्रचारक तथा संशोधक,साबय्या करपेत,बबलू सडमेक,मोहन मदने,भीमराव सिडाम गाव पाटील,महेश मडावी,विजय गेडाम,प्रमोद भोयर,सौ.शालिनीताई पोहणेकर महिला मोर्चा जिल्हा महामंत्री,विजयाताई विठलानी भाजप महिला ग्रामीण तालुका अध्यक्ष अहेरी,सौ.शेवंता प्रमोद भोयर ग्राम.पं. सदस्या नागेपल्ली, लक्ष्मीबाई सिडाम ग्राम.पं. सदस्या नागेपल्ली उपस्थित होते.

 

पुढे बोलताना आदिवासी संस्कृती ही देशाला प्रेरणा देणारी आहे.आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी युवा पुढीने पुढाकार घ्यावा.एवढेच नव्हेतर वीर बाबुराव शेडमाके यांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इंग्रजाविरुद्ध अठराव्या शतकात कठोर संघर्ष केला. त्यांचा संघर्ष समाजासाठी प्रेरणादायी असून हा संघर्ष आपल्याला विसरता येणार नाही.आपल्या गावात उभारलेला पुतळा तरुणांना प्रेरणा देत राहील असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

एखाद्या व्यक्तीला किंव्हा समाजाला पुढे जायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.आदिवासी समाजातील मुलामुलींनी शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे,भविष्यात कुठलीही मदत लागल्यास निःसंकोचपणे भेटा असे देखील त्यांनी समाजबांधवांना आवाहन केले.दरम्यान टेकमपल्ली गावात मान्यवरांच्या हस्ते विविध पुतळ्यांचे अनावरण करून सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले.राजेंचे गावात आगमन होताच ढोल ताश्यांच्या गजरात भव्य असा जंगी स्वागत केले.

  • ११ जोडपी झाले विवाहबद्ध
  • आयोजित कार्यक्रमात परिसरातील आदिवासी ११ जोडपी विवाह बद्द झाले.आदिवासी जोडप्यांचे धार्मिक व पारंपारिक पद्धतीने विवाह लावण्यात आला. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी संसार उपयोगी वस्तू भेट देत वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिले.