आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या पाश्र्वभुमीवर मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांची गडचिरोली जिल्हयास भेट

285

गडचिरोली दि. 22 मार्च

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मा. पोलीस महासंचालक साो. यांनी घेतला आढावा

* माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणा­या सी-60 पथकातील अधिकारी व जवानांचा केला सत्कार

दिनांक 16/03/2024 रोजी पासुन आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचार संहिता लागू असल्याने, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ही शांततामय वातावरणात यशस्विरीत्या पार पडावी या उद्देशाने सदर निवडणुकीबाबत आढावा घेण्याकरीता मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमती रश्मि शुक्ला साो. यांनी मा. अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म. रा. श्री. संजय सक्सेना सा., मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) म. रा. श्री. प्रविण साळुंके सा., मा. आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग म. रा. श्री. शिरीष जैन सा., मा. पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल सा. यांच्या उपस्थितीत आज दि. 22 मार्च 2024 रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी मा. पोलीस महासंचालक साो. यांनी लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांच्या असंवैधानिक कृतींना आळा बसावा यासाठी योग्य व्युहरचना आखणेबाबत मार्गदर्शन करुन आढावा घेतला.

 

यासोबतच दिनांक 19/03/2024 रोजी पहाटेच्या सुमारास कोलामर्का पहाडी जवळ मुद्दमुडगू जंगल परिसरात माओवादी व पोलीसांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये गडचिरोली पोलीस दलातील सी-60 पथकातील जवानांनी आपले अदम्य साहस व शौर्य दाखवित 02 डीव्हीसीएम दर्जाच्या माओवाद्यांसह एकुण 04 जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त केले होते. या चकमकीमध्ये सहभागी असलेल्या सर्व सी-60 पथकातील अधिकारी व जवानांचा मा. पोलीस महासंचालक साो. यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार समारंभादरम्यान आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मा. पोलीस महासंचालक साो. मॅडम यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 कंमाडोंच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे मनोबल उंचाविले. यासोबतच गडचिरोली जिल्ह्रातुन माओवाद घालवण्याची जबाबदारी आपली असुन, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक ही व्यवस्थित पार पडणार अशी अपेक्षा आहे. तसेच माओवादविरोधी अभियानामध्ये आपल्या कोणत्याही जवानाला ईजा झाली नाही, ही निश्चितच चांगली बाब असून येत्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना अजुन जास्त सतर्क राहून एकत्रित मिळुन काम करावे लागेल असे सांगितले.

 

सदर कार्यक्रमास मा. अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म. रा. श्री. संजय सक्सेना सा., मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) म. रा. श्री. प्रविण साळुंके सा., मा. आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग म. रा. श्री. शिरीष जैन सा., मा. पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल सा., मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल सा., मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपुर श्री. मुम्मका सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप आदी उपस्थित होते.