रंगपंचमी म्हणजे ‘रंगाचं सण, राधा,कृष्णा चे प्रेमाचे रंग. वसंत ऋतू चे प्रकृतीवर प्रेमाचे रंग.

325

आपला देश धर्म ,संस्कृती आणि सण त्योहारांच देश आहे.आपल्या देशातील प्रत्येक सण ऋतूशी जुळलेलेआहे.अपले पूर्वजांनी प्रत्येक ऋतूच्या आगमनाची स्वागत सण साजरा करून केलेले आहे .ऋतू बदलला की प्रकृती सुद्धा आपली रंग बदलवतात .काही वृक्षांना त्या ऋतू मधे नवीन पान ,फुल ,फळ लागतात .त्याच पान फूल आणि फळांचा उपयोग करून आपल्याला ते सण साजरा करायचे असते .

.त्याच प्रमाणे होळी किंवा रंगपंचमी वसंत ऋतूच्या महत्त्वाचं सण आहे.फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंग पंचमी हा सण साजरा केल्या जातो.धुळीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोउत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात .

धार्मिक मान्यता असी आहे की द्वापरयुगात गोकुळात बाळ कृष्णा आपल्या गोपाळ सवंगडयांवर पीचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करत असे . तेव्हा पासूनच रंग खेळण्याची परंपरा सुरू झालेली आहे . आपल्या भारत देशात संपूर्ण देशातच होळी साजरा करण्यात येतो परंतु वेगवेगड्या प्रांतात काही रीती रिवाज वेगळे आहेत .महाराष्ट्रात पौर्णिमेचा दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्यादिवशी रंग खेळतात.परंतु उत्तर भारत आणि बंगाल प्रांतात पौर्णिमेच्या आदल्यादिवशी होलिका दहन आणि पौर्णिमेच्या दिवशी रंग खेळतात .बंगाल प्रांतात ‘होळी , बाळ गोपाळाचं सण आहे .मोठे लोक पण खेळतात .पण होळी ची तयारी बाळ गोपाळच करतात.लहान मुले होळीच्या आदल्या दिवशी पळसाचे फूल जमा करून आणतात .आणि ते फूल पाण्यात भिजावून ठेवतात.रात्रभर पाण्यात भिजवल्य नंतर पहाटे उठून मोठ्यांच मदतीने चुलीवर मोठा लोखंडीच्या कढई मधे ते फूल पाणी टाकून सिजवतात .सिझले की छान शेंद्री रंग तयार होतात. ते रंग थोडा थंड झाला की मग ते रंग बादली मधे भरून आपापली बादली घेऊन पिचकारी घेऊन पिचकारीत रंग भरून रंग खेळतात.आणि होळी पेटवतानी सुद्धा बंगाल ची परंपरा अशी आहे की गावाजवळ च एक झाड अस जे काटेरी आहे .जसे बोरांच झाड ते पण मेलेली म्हणजे ते काही उपयोगाचे नाही अस्या झाडावर पाला पाचोरा जमा करून लहान मुले होळी पेटवतात. मोठे लोक होळीच्या दिवशी गावामध्ये श्रीकृष्णाचे मंदिरात भजन कीर्तन करतात गावात रस्त्यांनी फिरून कीर्तन मंडळी कीर्तन करतात.आणि घरो घरी पूजेची तयारी करून असते कीर्तन मंडळी घरी आले की त्यांचं कीर्तन झालं की सगळ्यांना मिठाई आणि.फळांचे प्रसाद द्यायचं अशी पद्धत आहे.आजकाल च्या भाषेत इकोफ्रेंडली होळी.आपले पूर्वज निसर्ग पूजक होते. आपले सर्व सण मानव जाती चे आरोग्याला फायद्याचे आहे असे निर्माण केलेली आहे.पण अलीकडे जरा आपले सगळे चांगले रीती रीवाजाचे चुकीचं अर्थांनी मांडणी करण्यात येत आहे. त्याचे जबाबदार कुठेतरी आपणच अहो.म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करू की केमिकल मुक्त होळी साजरा करू.सर्व नैसर्गिक वस्तू पासून बनवलेले रंगाचं वापर करू .आणि आपला आरोग्यला जपू .

 

होळी सरलता ,शुद्धता , राग,अनुराग,उल्लासंच सण आहे .या ऋतू मधे जसे वृक्षांना नवीन पान ,फूल येतात .वातावरण मनमोहक होऊन जातात तसाच सर्वांचं आउस्यात नवीन ऊर्जा , आकांक्षा निर्माण होऊ ध्या.सर्वांना होळी पौर्णिमा आणि रंगपंचमी ची खूप खुप शुभेच्छा .

तिलोत्तमा समर हाजरा

ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टल