प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची भाजप आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी

59

संघटनाला मिळणार बळ

ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली (Gadchiroli), ता . २६ : भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी मोर्चाच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वर्तुळातून देण्यात आली.
ही नियुक्ती भाजपा आदिवासी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या अनुमतीने आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते यांनी ती जाहीर केली.
याप्रसंगी गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. सुरपाम यांचा सत्कार करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे आणि माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते त्यांना पक्षाचा दुपट्टा घालून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, महामंत्री विनय मडावी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे, महामंत्री प्रकाश गेडाम, डॉ. नितीन कोडवते तसेच डॉ. चंदा कोडवते यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांनी आपल्या निवडीचे श्रेय पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देत, संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

#GadchiroliNews
#GlobalGadchiroli
#BJP
#BJPAdiwasiMorcha
#AdiwasiMorcha
#ShrimantSurpam
#SantoshSurpam
#PoliticalNews
#MaharashtraPolitics
#GadchiroliPolitics
#DistrictVicePresident
#PartyAppointment
#Leadership
#PoliticalUpdate
#BJPNews
#AdiwasiLeadership
#LocalNews
#BreakingNews
#IndiaPolitics

——————————————