राज्य राखीव पोलीस भरती गट क्र. १७ मध्ये रोहित बिरजु मट्टामी यांची निवड; महाविद्यालयात सत्कार

79

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. १० : बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित मातोश्री कौशल्याबाई बोगावार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवेगाव (मुरखळा), गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी राज्य राखीव पोलीस दल भरती गट क्र. १७ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी रोहित बिरजु मट्टामी (रा. वट्टेगट्टा, ता. एटापल्ली) यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाल्याने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने रोहित मट्टामी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक संचित बोरकर, प्रा. श्रीमंत सुरपाम, ग्रंथपाल वर्षा काटकर, राहुल दुधे, संगीता गडपल्लीवार आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

निवड झालेल्या रोहित मट्टामी यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील बिरजु मट्टामी, आई कमल बिरजु मट्टामी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन बोगावार तसेच संचालक प्रांजल बोगावार यांच्या मार्गदर्शनाला दिले. महाविद्यालयात मिळालेले शैक्षणिक वातावरण, नियमित मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळेच हे यश संपादन करता आले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे या यशातून सिद्ध झाले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी हर्षल कोल्हे, सुनेश मट्टामी, युवराज कडते आणि करन आत्राम उपस्थित होते.