महाराजस्व अभियान’; विविध सरकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार

22

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ७ : येथील तहसील कार्यालयाच्या वतीने शुक्रवार (ता. ८) ‘महाराजस्व अभियानाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील नवीन नगरपरिषद सभागृह (DRS हॉल), महिला कॉलेज जवळ येथे हा कार्यक्रम पार पडणार असून नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत विविध महत्त्वाच्या योजना आणि सेवांचे एकाच ठिकाणी निराकरण केले जाणार आहे. यामध्ये सामाजिक न्याय योजना, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेसाठी मार्गदर्शन व लाभ मिळणार आहे. पी. एम. किसान योजनेचा लाभ, सात-बारा वाटप आणि ॲग्री स्टॅक फार्मर आयडी तयार करण्याची सुविधा राहिल. कलम ८५ अन्वये आपसी वाटणी, कलम १५५ नुसार सात-बारामधील चुका दुरुस्ती करणे, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास (डोमिसाईल), जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी सहाय्य करण्यात येईल. आपल्या हक्काची योजना आणि सेवांचा लाभ नागरिकांना सुलभरित्या मिळावा हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, असे तहसील कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी गडचिरोली तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.

——————————————