१२ वर्षीय सनाया मेश्राम मृत्यूशी झुंजतेय; गरीब कुटुंबाची समाजाकडे मदतीची आर्त विनंती
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील गडीसुर्ला गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ज्या वयात एका मुलीने शाळेत जाऊन मोठी स्वप्नं पाहायची असतात, त्या वयात अवघी १२ वर्षांची सनाया चरणदास मेश्राम आज रुग्णालयाच्या बेडवर जीवासाठी संघर्ष करत आहे.
अत्यंत गरीब कुटुंबातील सनायाचे आई-वडील रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कधी काम मिळतं, कधी उपासमारीची वेळ येते. अशा परिस्थितीत काही दिवसांपूर्वी सनायाला पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला साधा आजार समजून गावात उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती अधिकच खालावत गेली. शेवटी तिला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. विविध तपासणीनंतर डॉक्टरांनी दिलेला अहवाल पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सनायाचे तब्बल ८० टक्के लिव्हर खराब झाले असून तातडीने लिव्हर ट्रान्सप्लांट करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तिचा जीव धोक्यात येऊ शकतो.
या शस्त्रक्रियेसाठी तब्बल २८ ते ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रोज मजुरी करून संसार चालवणाऱ्या कुटुंबासाठी ही रक्कम अशक्यप्राय आहे. तरीही एका बापाची आपल्या लेकीसाठीची धडपड थांबलेली नाही. सनायाचे वडील स्वतःचे लिव्हर दान करण्यास तयार झाले आहेत. मात्र आर्थिक अडचणीमुळे उपचार रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. आईच्या डोळ्यांत अश्रू, वडिलांच्या चेहऱ्यावर असहाय्यता आणि रुग्णालयाच्या बेडवर जीवासाठी लढणारी सनाया… हे दृश्य कोणाच्याही मनाला हेलावून टाकणारे आहे.
आज या कुटुंबाला समाजाच्या मदतीची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या परीने छोटीशी मदत केली, तर एका निष्पाप मुलीला नवजीवन मिळू शकते. मदतीसोबतच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
📞 मदतीसाठी संपर्क : +91 80552 89915 (रामटेके)
✅ सनायाचे सर्व मेडिकल रिपोर्ट उपलब्ध असून माहिती सत्य असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
कृपया ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.
कदाचित तुमच्या एका शेअरमुळे…
एका छोट्याशा मदतीमुळे…
एका निरागस मुलीचे प्राण वाचू शकतात.
“जनसेवा हीच ईश्वरसेवा…!”
“माणुसकी अजून जिवंत आहे, हे कृतीतून दाखवूया…”
#SaveSanaya #HelpSanaya #HumanityFirst #DonateForLife #LiverTransplant #SupportNeeded #SaveGirlChild #MedicalEmergency #HopeForSanaya #TogetherWeCan #HelpPoorFamily #LifeSavingSupport #PrayForSanaya #ChildHealth #EmergencyHelp #SocialCause #Maanuski #जनसेवा #माणुसकी #सनाया_मेश्राम #SaveALife #ViralNews #TrendingNow #Chandrapur #MaharashtraNews #HelpNeededUrgent #DonateAndShare #HumanityStillAlive #BeTheReason #SupportHumanity
——————————————————————










