आज आपण पादाभ्यंग म्हणजेच पायाला तेल लावून मसाज करण्यासंदर्भात पूर्ण माहिती पाहणार आहोत. पादाभ्यंग करण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत. तसे पाहायला गेले तर आयुर्वेदातील सर्व प्रमुख आचार्यांनी आपल्या पूर्ण शरीराला तेल लावून मसाज करावे, असे सांगितले आहे, परंतु आजकालच्या धावपळीच्या युगात आपल्याकडे एवढा वेळ नसतो म्हणून अष्टांगहृदयम या ग्रंथामध्ये दिनचर्येबद्दल सांगताना असे लिहिले आहे की, शिरःश्रवणपादेषु तं विशेषेण शीलयेत् | म्हणजेच डोके, कान आणि पाय यांना विशेष रूपाने अभ्यंग करणे गरजेचे आहे. सुरुवात करूया आचार्य चरक यांच्यापासून. आचार्य चरक यासंदर्भात काय म्हणतात ते आपण पाहू.
खरत्वं स्तब्धता रौक्ष्यं श्रमः सुप्तिश्च पादयोः । सद्य *एवोपशाम्यन्ति *पादाभ्यङ्गनिषेवणात् ॥
जायते सौकुमार्यं च बलं स्थैर्य * *च पादयोः । दृष्टिः प्रसादं लभते मारुतश्चोपशाम्यति ।।*
न च स्याद्गृध्रसीवातः पादयोः स्फुटनं न च । न सिरास्नायुसङ्कोचः पादाभ्यङ्गेन पादयोः ।।
म्हणजेच दोन्ही तळपायाला रोज तेलाने मसाज केल्यास पायमधील जडपणा , कोरडेपणा , थकवा, शीघ्र म्हणजेच लवकर कमी होतो. पायांमध्ये ताकद येते तसेच पाय सुदृढ होतात.पायांना तेलाने मसाज केल्यामुळे डोळ्यांची दृष्ट्टी सुधारते. शरीरात वाढलेले वात विकार कमी होतात.वातप्रकोपामुळे वाढणारे आजर होण्याची शक्यता रहात नाही. पायाला तेल लावून घासल्यामुळे पायांना भेगा पडत नाहीत.तसेच शिरा आणि स्नायू यांचे आजार होत नाहीत. आचार्य चरक यांनी यामध्ये विशेष करून सायटीका या आजाराबद्दल सांगितले आहे. रोज पायाला तेल लावून मसाज केल्यास सायटीकासारखा आजारसुद्धा कमी होतो. आपल्याला जर पादाभ्यांगचे संपूर्ण फायदे पाहिजे असेल तर पादाभ्यांग करताना कांस्याची वाटी च तळाला तेल लाऊन तळपायाला आणि तळहाताला मसाज करावे.
आता आपण पाहू पादाभ्यांग कधी करायला हवे?
आपल्याला दररोज पादाभ्यांग करायचेच आहे. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पायाला तेल लावून मसाज करू शकता. सकाळी आंघोळीपूर्वी किंवा अंघोळ झाल्यानंतरसुद्धा तुम्ही पायाला तेल लावून मसाज करू शकता. परंतु जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी मसाज केला तर तुम्हाला रात्री झोपदेखील चांगली येईल, तुमचा दिवसभराचा थकवादेखील निघून जाईल आणि जे तेल तुम्ही पायाला लावले आहे ते जास्त वेळासाठी पायाला राहील. म्हणून रात्री झोपताना पायाला तेल लावलेले सर्वोत्तम आहे. पादाभ्यांग हे रोज कमीत कमी दहा मिनिटे करावे रात्री दहा मिनिटे पादाभ्यांग केल्यास तुम्हाला अतिशय गाढ अशी झोप लागेल व सकाळी उठल्यानंतर तणावमुक्त झाल्याचे जाणवेल.
कोणते तेल वापरावे ?
तिळाचे तेल, नारळाचे तेल, महानारायण तेल, चंदन बला लाक्षादी तेल किंवा गाईचे तूप याचाही वापर तुम्ही पादाभ्यांग करण्यासाठी करू शकता. शरीरात वात आणि कफ यांचे प्रमाण वाढले असेल तर तिळाचे तेल तुम्ही वापरू शकता. तसेच शरीरात पित्तदोष वाढलेला असेल, पायात जळजळ होत असेल तर तुम्ही गाईचे तूप वापरू शकता. ज्यांना बऱ्याच वर्षांपासून मधुमेह आहे ते गावरान गाईचे तूप वापरू शकतात. डायबिटीसमुळे होणारी पायातील जळजळ यामुळे कमी होते.
कुणी करायचे नाही ?
ज्यांना सर्दी, खोकल्यासारखे आजार झाले आहेत, अजीर्ण असेल किंवा वमन, विरेचनसारखी क्रिया केलेल्या दिवशी पादाभ्यंग करायचे नाही. तसेच जेवण झाल्या झाल्या लगेच पादाभ्यांग करायचे नाही. याव्यतिरिक्त सर्वजण पादाभ्यंग करू शकतात.
– डॉ. अनिल एन. निकोडे
निसर्गोपचार चिकित्सक व योग प्रशिक्षक,
गडचिरोली.
(पादाभ्यांग साठी वापरले जाणारे कांस्यची वाटी आपल्याकडे उपलब्ध आहे .आवश्यकता असल्यास संपर्क करावे )(8080254808 )—————–