विजयी संकल्प करत बुथ प्रमुख व वॉरियर्स यांनी कामाला लागावे.खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन.

70
  • दिभना येथे पंचायत समिती गणाच्या बुथ प्रमुख व वॉरियर्स पदाधिकारी बैठक संपन्न.
  • गडचिरोली:महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली मौजा- दिभना येथे भाजपा बुथ प्रमुख व वॉरियर्स पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

  • या बैठकीला महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते यांनी बोलतांना म्हणाले
  • या दहा वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे नेतृत्वात केंद्र सरकारने अनेक योजना राबवित देशाला सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला.गरीब कल्याण योजना, महिला सशक्तिकरण, देशाअंतर्गत आंतरराष्ट्रीय, देशपातळीवर सुद्धा देशाचे नाव उंचावले आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा बळकटी करण्यात मोलाची भूमिका आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जीनाचं पंतप्रधान बनवायचे असेल तर मलाही सुद्धा विजयी करत विजय संकल्प अब कि बार चारसौ पार यासाठी बुथ प्रमुख,व वॉरियर्स यांनी विजय आपलाच आहे असा संकल्प करून कामाला लागावे.असे आवाहन खा.नेते यांनी करत
  • याबरोबरच केंद्र शासनाच्या संपुर्ण योजनाची माहीती सुद्धा या बैठकीदरम्यान देण्यात आली.
  • यावेळी प्रामुख्याने आमदार डॉ. देवराव होळी,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,डॉ.नितीन कोडवते,लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे,किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,भाजपा जेष्ठ नेते गजानन येंगद्दलवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर, माजी पं. स.उपसभापती विलास देशमुखे, महामंत्री बंडू झाडे,देवानंद चलाख, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्चना बोरकुटे, शहर महामंत्री अर्चना चन्नावार, जेष्ठ नेते बालाजी पा.जेंगठे, टिकाराम गावतुरे,विनोद चूनारकर,विलास जेंगठे,खुशाल चुधरी,राजू मुरतेली,दुधराम गेडाम,रमेश नैताम,तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्तेगण उपस्थित होते.