गडचिरोली, ता. १९ : शहरातील कर सल्लागार ॲड. संदीप धाईत यांचे वडील वसंत विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक भाऊराव विठोबाजी धाईत यांचे सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी ४.३५ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३५ वाजता कठाणी नदीघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.