लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

276

गडचिरोली, ता. २६ : चित्रपटसृष्टीतून अतिशय दुःखद अशी बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं आज २६ फेब्रुवारी रोजी निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

सूत्रांच्या माहितीनुसार ते गेली अनेक दिवस आजारी होते. आजारपणामुळे त्यांचं निधन झालं आहे. आज २६ फेब्रुवारी रोजी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते आणि ते कोणालाही भेटत नव्हते. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाबद्दल एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं आहे. यात त्यांनी लिहिलंय, ‘अत्यंत जड अंतःकरणाने