गडचिरोली, दि :14 मार्च
सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडुन शोध घेतलेल्या 52 मोबाईल व 01 टॅबचे वाटप.
तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली जाते. सदर बाबत सायबर पोलीस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.
मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवला किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. या बाबींचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन मार्फत हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो. मागील वर्षी सन 2023 मध्ये एकुण 135 मोबाईलचे शोध घेण्यात आले असुन त्यांची अंदाजे किंमत एकुण 20,27,000/- रुपये एवढी आहे. तसेच माहे जानेवारी 2024 ते मार्च 2024 पर्यंत एकुण 52 मोबाईल व 01 टॅब मिळुन आले असुन त्यांची किंमत 7,31,752/- एवढी असल्याने सदरचे मोबाईल आज दिनांक 13-03-2024 रोजी संबंधितांना पोलीस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे बोलावुन मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे हस्ते प्रदान करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम रमेश सा. अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी पोनि. उल्हास भुसारी, पोउपनि निलेश वाघ व पोलीस अंमलदार नापोअं/1086श्रीनीवास संगोजी, मनापोअं/638 वर्षा वहिरवार, मनापोअं/2918 संगणी दुर्गे, मनापोअं/गायत्री नैताम व मपोअं/किरण रोहणकर यांनी पार पाडली.
यावेळी बोलतांना मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी जनतेला आवाहन केले की, सध्या सायबर गुन्ह्राचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. त्यामुळे जनतेने सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे व मोबाईल चोरी झाला असेल तर, तात्काळ ceir.gov.in या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी. तसेच आपला ऑनलाईन आर्थिक फ्रॉड झाला असेल तर 1930 या नंबरवर तक्रार नोंदवावी. यासोबतच मोबाईल कुठे हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवुन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा.