गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे तांडव; तब्बल ३१ मार्ग झाले बंद

92

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २१ : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे तब्बल ३१ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे.

रविवार (ता. २१) सायंकाळी ५ वाजतापर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड, अहेरी- मोयाबिनपेठा रस्ता वट्रा नाला ता. अहेरी, आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (आलापल्ली ते मोसम भाग बंद) ता. अहेरी, जारावंडी ते राज्यसीमा भाग ता.धानोरा, वैरागड-जोगीसाखरा- शंकरपुर-चोप – कोरेगाव रस्ता ता. वडसा, कारवाफा-पोटेगाव रस्ता, गोठनगाव-सोनसूरी रस्ता ता. कुरखेडा, वडसा- नवरगाव-आंधळी-चिखली रस्ता ता. देसाईगंज, लखमापूर-बोरी-गणपुर हळदीमाल नाला,आलापल्ली –भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्लकोटा नदी), भेंडाळा-अनखोडा रस्ता ता. चामोर्शी, मुल-हरणघाट रस्ता दहेगाव नाला ता. चामोर्शी, चांदेश्वर-टोला रस्ता ता. चामोर्शी, फोर्कुडी-मार्कंडादेव रस्ता ता. चामोर्शी, वडसा- नैनपुर- विठ्ठलगाव रस्ता ता. कुरखेडा, चिखली-धमदीटोला रस्ता ता. कुरखेडा,) गोठनगाव-चांदगाव रस्ता ता. आरमोरी, आरमोरी-रामाळा रस्ता ता. आरमोरी, भाडभिडी-रेगडी-देवदा रस्ता ता. चामोर्शी, कोनसर -जामगड रस्ता ता. चामोर्शी, चामोर्शी-फराळा मार्कडादेव रस्ता, आरमोरी-शंकरपुर रस्ता, ठाणेगाव-वैरागड रस्ता, गडचिरोली-आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग, गडचिरोली-चामोर्शी रस्ता राष्ट्रीय महामार्ग, चंदनवेली-एटापल्ली-गट्टा रस्ता बांडीया नदी, आलापल्ली-आष्टी रस्ता दिना नदी, मुलचेरा-आष्टी रस्ता, एटापल्ली-बुर्जी- कांदोळी- ताडगाव रस्ता असे तब्बल ३१ मार्ग बंद आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय शहरी भागांतही पुराचे तांडव बघायला मिळाले. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात नगर परीषदेच्या आवारातच गुडघाभर पाणी साचले होते. शिवाय शहरातील क्रांतिनगर, गणेशनगर व इतर अनेक परीसरात पाणी साचून होते. गणेशनगर येथील अनमोल अपार्टमेंटमध्ये पाणी गेल्याने तेथील नागरिकांनाही प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले अद्याप ओसंडून वाहत आहेत. आकाशातही ढग दाटून आहेत आणि अधुनमधुन पावसाची रिपरिप सुरूच आहे. गोसेखुर्द धरणातून मोठा विसर्ग होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

———————————-