कुणघाडा येथील शेतातील बांधावर आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी.
गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार.
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक 4 ऑगष्ट गडचिरोली
चामोर्शी : मागील काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे व निर्माण झालेल्या पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे शेत पिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कुणघाडा परिसरातील नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी करताना केली.*
*यावेळी पो. पा.दिलीप जी शृंगारपवार भाजपा युवा नेता उमेश कुकडे, हर्षद भांडेकर, दिपक भांडेकर, भाऊजी सातपुते, साहिल वडेट्टीवार, संतोष पिपरे, राजू वासेकर, आनंदराव उडान, हरिदास गव्हारे, गोपाल गव्हारे, हरिभाऊ चापडे, दिलीप पवार, कवडू दूधबळे, राजू कोठारे, चरण नैताम, भक्तदास कुणघाडकर, मधुकर टिकले, यमाजी कोसमसीले, धर्मदेव चापडे, प्रभाकर कोठारे, शामराव दूधबळे, ग्रामविस्तार अधिकारी, तलाठी, कृषि सहाय्यक तसेच नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते