गडचिरोली येथे भाजपा शहर कार्यकारणी बैठक संपन्न
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक १२ ऑगस्ट गडचिरोली
मागील १० वर्षात आपण गडचिरोली शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला असून शहराचा विकासात्मक कायापालट केला आहे . शहरातील प्रत्येक वार्डात भक्कम व मजबूत रस्ते, नाल्या ,वीज , वार्डावॉर्डात दवाखाने ,ओपन स्पेसचे सौंदर्यकरण,अनेक वॉर्डांत समाज बांधवांसाठी सभागृह, १०० कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना, मोठ्या प्रमाणावर घरकुल, झोपडपट्ट्या कायम करून पट्टे मिळून देण्यासाठी सतत प्रयत्न, नवीन पाण्याच्या टाक्यांसोबतच जिल्हा केंद्र असलेल्या या शहराची भविष्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करणारे कोटगल बॅरेज, शहर केंद्रावर मोठे स्त्री व बाल रुग्णालय, नवीन मेडिकल कॉलेज, विभागीय बस स्थानक कार्यालय,३२ कोटीचे नवीन तहसील कार्यालयासह अनेक प्रशासनिक इमारतींना निधी उपलब्ध दिला, यासह अनेक लहान-मोठी कामे भविष्यात प्रस्तावितही केली आहे. सर्वसामान्य गरीब लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक अभियानांची रचना यासह अनेक लहान-मोठी कामे या शहराच्या विकासासाठी आपण केली असून मागील ५० वर्षाच्या कालावधीत जेवढा निधी या शहराच्या विकासासाठी कोणी आणू शकला नाही तेवढा निधी आपण केवळ या आमदारकीच्या १० वर्षाच्या कालावधीत आपण आणला आहे . माञ हे जनतेला सांगण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी गडचिरोली शहराच्या कार्यकारणीच्या बैठकीच्या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.*
यावेळी बैठकीला , माजी आमदार नामदेवरावजी उसेंडी, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे , जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्ह्याच्या महामंत्री योगिताताई पिपरे,शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,डॉ चंदाताई कोडवते, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष गीता ताई हिंगे , ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे , ओबीसी आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिल पोहनकर, डॉक्टर नितीनजी कोडवते, शहर महामंत्री विनोद देवोजवार, नरेश हजारे ,विवेक बैस , प्रा. अरुण ऊराडे , यांचे सह मान्यवर उपस्थित होते.