शाळेच्या परीसरात युवतीचा मृतदेह : उडाली खळबळ

44

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २४: बदलापूरसह विविध ठिकाणीं महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटन राज्यात घडत असताना शनिवार (ता. २४) सकाळी कुरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका युवतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ज्योती उर्फ चांदनी मसाजी मेश्राम (वय २६) असे मृत युवतीचे नाव आहे.

शनिवारी सकाळी येथील जिल्हा परिषद आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या युवकांना भिंतीला लागून युवतीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळावर बघ्यांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले व ठाणेदार महेंद्र वाघ यांनी ताफ्यासह घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी पंचनामा केल्यानंतर युवतीचा मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. युवतीच्या शरीरावर मार लागल्याच्या कुठल्याही खुणा नाहीत. शिवाय गळाही आवळलेला नाही. त्यामुळे प्राथमिक तपासात युवतीचा मृत् नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. मृत्यूचे नेमके कारण उत्तरीय तपासणीनंतरच स्पष्ट होईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.मृत ज्योती रात्री १० वाजताच्या सुमारास घराबाहेर गेली होती. ती उशिरापर घरी परत न आल्याने तिचा शोध घेतला. परंतु ती सापडली नाही. शनिवारी सकाळी तिच्या मृत्यूची बातमी कळताच मृत युवतीच्या आईने एकच हंबरडा फोडला. काही दिवसांपूर्वी एका दुर्घटनेत मुलगा गमावलेल्या आईवर या घटनेने मोठे संकट कोसळले आहे. या घटनेने समाजमन हादरून गेले आहे.

———————-