इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गरजूंच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न:-माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे

88
  • इनरव्हील क्लब गडचिरोलीच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय बॅग,नोटबुक व पेनचे वाटप

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली :-दि.१६ सप्टेंबर

 

आपल्या सभोवताली अनेक गरजु लोक आहेत.इनर व्हील क्लब च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे व गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न इनर व्हील क्लब करीत आहे.असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.

इनर व्हील क्लब गडचिरोलीच्या वतीने स्थानिक मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय बॅग,नोटबुक व पेनचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन बोलत होत्या.

याप्रसंगी इनर व्हील क्लब 303 च्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.रमाताई गर्ग,इनरव्हील क्लब गडचिरोली अध्यक्ष सौ.प्रतिभाताई रामटेके, सचिव सौ.विजयाताई चव्हाण,चंद्रपूर जिल्हा सचिव सौ.पल्लवीताई,माजी अध्यक्ष सौ.सुधाताई राठी,सौ.मिराताई सारडा,सौ.मंजुताई काबरा,श्रीमती प्रतिभाताई चौधरी व इनरव्हील क्लब गडचिरोलीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यरांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय बॅग,नोटबुक व पेनचे वितरण करण्यात आले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शिखाताई काबरा यांनी केले तर आभार सौ.वैशालीताई बट्टूवार यांनी मानले.