गडचिरोली,ता. १५ : जिल्ह्यातील एकमेव असलेल्या देसाईगंज येथील रेल्वे स्टेशनवर यशवंतपुर-कोरबा-वैनगंगा एक्सप्रेसचा थांबा देण्यासंदर्भात खासदार अशोक नेते यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. गुरुवार (ता. १५) सायंकाळी ४ वाजता त्यांच्याच हस्ते हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येईल .
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील एकमेव रेल्वे स्टेशन देसाईगंज (वडसा ) आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची व प्रवाशांची वर्दळ असते. कोरोना दरम्यान सुपरफास्ट व पॅसेंजर सर्वच गाड्या बंद होत्या. परंतु नंतर कोरोना शिथिलतेनुसार संपूर्ण गाड्या चालू झाल्या. कोरोनाच्या पूर्वी कोरबा-यशवंतपुरम-वैनगंगा-सुपरफास्ट ट्रेनचा थांबा (स्टापेजेस) देसाईगंज ( वडसा) येथे होता. परंतु कालांतराने देसाईगंज ( वडसा) येथे थांबा बंद केल्याने प्रवासी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होऊन रोष व्यक्त केला जात होता. खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे वारंवार भेट घेऊन ही समस्या सातत्याने सांगितली होती. या प्रयत्नांना अखेर यश येऊन देसाईगंज (वडसा )रेल्वे स्टेशनला यशवंतपुर-कोरबा-वैनगंगा एक्सप्रेस देसाईगंज (वडसा )रेल्वे स्टेशन थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे. खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
—————————