गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटुंबियांना अॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात

309
  • गडचिरोली , दि.४ : मार्च
  • मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. यांचे हस्ते कुटुंबियांना 10 लाख रुपयाचा धनादेश स्वाधीन .

बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श अॅक्सिस बँकेने ठेवला आहे. दिनांक 02/09/2023 रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी विनोद नंदाजी निकोडे यांचे यकृतच्या दिर्घ आजाराने निधन झाले होेते त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखुन अॅक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती लोचना विनोद निकोडे यांना आर्थीक मदत स्वरुपात मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. यांचे हस्ते आज दि. 04/03/2024 रोजी 10 लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला.

यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. तसेच अॅक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक, श्री. राकेश राजेंद्र वल्लालवार व उप-शाखा व्यवस्थापक श्री. मुर्लीधर नैताम यांचे उपस्थितीत मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.