आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश
गोंडवाना विद्यापीठात बंगाली भाषा हा अभ्यासक्रम राबविण्याच्या अनुषंगाने अभ्यास मंडळाचे गठण
मंडळामध्ये गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील बंगाली भाषिक शिक्षक प्राध्यापकांचा समावेश
दिनांक ५ मार्च २०२४ गडचिरोली
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे बंगाली भाषा हा अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये राबविण्याच्या अनुषंगाने माननीय प्र कुलगुरू यांनी बंगाली भाषा तदर्थ (Ad-hoc) अभ्यास मंडळाचे गठन केलेले आहे.आमदार डॉक्टर देवरावजी यांच्या प्रयत्नातून अखेर बंगाली भाषा या विषयाला धरून मंडळाची स्थापना केल्याने विद्यापीठाचे व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे बंगाली बांधवांतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.या मंडळामध्ये गडचिरोली ,चंद्रपूर जिल्ह्यातील बंगाली भाषिक शिक्षक-प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला असून विद्यापीठांमध्ये बंगाली भाषेमध्ये अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अभ्यास मंडळाची सभा देखील या ७ मार्चला आयोजित करण्यात आलेली आहे.