- गडचिरोली दि ,05-03-2024
- पोलीस स्टेशन आरमोरी येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे यांची यशस्वी कामगिरी
गडचिरोली जिल्हा माओवाददृष्टया अतिसंवेदनशिल जिल्हा असून गडचिरोली पोलीस दलातील पोलीस जवान हे या दुर्गम-अतिदुर्गम भागात आपली सेवा बजावत विविध कलागुण जोपासत असतात दि. 02 ते 08 मार्च 2024 दरम्यान जम्मु काश्मीर पुलीस द्वारा आयोजित श्रीनगर येथे सुरु असलेल्या 23 व्या अखिल भारतीय पोलीस वाटर स्पोटर्स स्पर्धा 2023-24 मध्ये गडचिरोली पोलीस दलातील पोलीस स्टेशन आरमोरी येथील कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे यांनी अतिशय थंड (-1°ते -4°) इतक्या कमी तापमानात अतिशय कमी ऑक्सीजन मध्ये खेळल्या जानाया Coxless Four 1000 मीटर या क्रिडा प्रकारात महाराष्ट्र पोलीस संघाचे नेतृत्व करत सुवर्ण पदक प्राप्त केले.
पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे यांच्या या यशस्वी कामगिरी करिता मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.