गडचिरोली दि,07 :
287 युवक-युवतींना मिळाली नवीन रोजगाराची संधी.
कृषी सहलीला गेलेल्या 50 महिला शेतकयांना अत्याधुनिक साहित्यांचे वाटप
127 महिला वाहन चालक प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पुर्ण
गडचिरोली जिल्हयातील गरजु युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडाण अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रातील बेरोजगार युवक-युवतींकरीता गडचिरोली पोलीस दल, एसआयएस कंपनी चंद्रपूर व अमर सेवा मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 07/03/2024 रोजी “भव्य रोजगार मेळाव्याचे” तसेच महिला कृषी सहल अभ्यास दौरा क्र 12 व वाहन चालक प्रशिक्षण घेतलेल्या 127 महिला प्रशिक्षणाथींचे समारोपीय कार्याक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यायल परिसरातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले.
या रोजगार मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील विविध प्रकारच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी 250 ते 300 उमेदवार सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित उमेदवारांमधुन, एसआयएस कंपनी चंद्रपूर यांचे मार्फत 60 उमेदवारांची सिक्युरिटी गार्ड, तसेच अमर सेवा मंडळ नागपुर यांचे मार्फत 25 उमेदवारांची आयटी हार्डवेअर व 25 उमेदवारांची टिव्ही असेंब्ली ऑपरेटर प्रशिक्षणाकरीता निवड करण्यात आली. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. विविध प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने कृषी समृध्दी योजने अंतर्गत प्रकल्प कार्यालय भामरागड यांच्या सहायाने दिनांक 29/02/2024 ते 07/03/2024 रोजी पर्यंत भामरागड, एटापल्ली व हेडरी विभागातील 50 महिला शेतकयांसाठी कृषी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व महिला शेतकयांनी नागपुर, घातखेड (बडनेरा), अकोला, शेगाव व वरोरा येथील विविध संसोधन केंद्रास भेट देवुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेवुन आज गडचिरोली परत आले. या महिला शेतकयांना मान्यवरांच्या हस्ते महिला शेतकयांना पॉवर विडर मशीन व स्पे-पंप इ. कृषी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत दिनांक 07/02/2024 ते 07/03/2024 रोजी पर्यंत युवतींसाठी एक महिण्याचे निवासी चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. त्यात 127 युवतींनी सहभाग नोंदविला होता. या प्रशिक्षणादरम्यान महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देवुन वाहन परवाना प्रमाणपत्र देण्यात आले. त्याकरीता आज आयोजीत समारोपीय कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करतांना मा. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, ध्येय प्राप्ती करिता स्वत: प्राणणिकपणे प्रयत्न करा तुमच्या या प्रयत्नांना बळ देवुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून नेहमी तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक करातांना अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांनी गडचिरोली पोलीस दलाने सुरु केलेल्या स्किलींग इन्स्टिट्युट अंतर्गत सॉफटवेअर डेव्हलपर, मिडीया डेव्हलपर व वेब डेव्हलपर कोर्स बाबत माहिती सांगीतली.
सदर रोजगार मेळावा कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच एसआयएस (सिक्युरिटी) चंद्रपूरचे ऑपरेशन एक्झीक्युटीव्ह श्री. महीप सिंग बल, अमर सेवा मंडळ नागपूरचे सेंटर मॅनेजर श्री. जयेश पठारे, मोबलायझेनअमर सेवा मंडळ श्री. विपुल गायकवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.