भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने वडसा शहरात “नारी शक्ती वंदन” पदयात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

278

गडचिरोली,

भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडी च्या वतीने भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात नारी शक्ती वंदन पदयात्रेचे आयोजन वडसा शहरात करण्यात आले. नारीशक्तीचा सन्मान केल्याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.

“फिर एक बार मोदी सरकार,अब की बार चारसो पार, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो” अशा घोषणा देत आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडीच्या वतीने “नारी शक्ती वंदन पदयात्रा” वडसा शहरात काढण्यात आली. ही पदयात्रा वडसा शहरातून मंगळवारी 5 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता आमदार कृष्णाभाऊ गजबे यांच्या कार्यालया समोरून प्रारंभ करून शहरातील मुख्य मार्गाने स्लोगन हातात घेऊन मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जय घोष करीत हुतात्मा स्मारक येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

या पदयात्रेचा शुभारंभ लोकसभा प्रमुख तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशनजी नागदेवे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला

यावेळी जिल्हा महामंत्री सदानंदभाऊ कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाऊ कुकरेजा,जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ जेठानी,तालुका अध्यक्ष सुनीलभाऊ पारधी,जिल्हा सचिव रोशनीताई पारधी,जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, महिला आघाडीच्या महामंत्री अर्चनाताई ढोरे,महामंत्री प्रिती शंभरकर,सिमा कन्नमवार, सोशल मिडिया जिल्हा संयोजिका वैष्णवी डोंगरे, जयश्री मडावी, रुपाली कावळे, बेबीनंदा पाटील तसेच भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या पदयात्रेला आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.