खासदार अशोक नेते यांनी आपल्या स्वगावी महाशिवरात्री निमित्ताने भगवान शंकर महादेव, काली माँ,दुर्गा माता,हनुमान मंदिरात भेट देऊन केली पूजा अर्चा.

271

 

गडचिरोली दि.१० :मार्च २०२४

खासदार अशोक नेते यांनी महाशिवरात्री निमित्ताने भगवान शंकर महादेव,काली माँ,दुर्गा माता,हनुमान मंदिरात खा.नेते यांनी स्वगावी मौजा- बरडपवनी ता.नरखेड जि.नागपुर येथे आज महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाच्या वातावरणात आरती व गोपाळकाल्याची पूजा अर्चा केली.

 

यावेळी या गोपाळकाला च्या निमित्ताने भजन किर्तन व महाप्रसादाचे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खा.नेते यांनी देवस्थानात येणाऱ्या समस्त जनतेला भाविक भक्तांना महाशिवरात्री निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी सोबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,सुखदेवराव नेते,सुरेश राठोड,अजबराव सोनूले,दिलिप चौधरी,विठ्ठल चौधरी,बंटी उमाडे,सुधाकर फुलंबकर,अशोक बरखडे,गणेश वाघ,तसेच मोठ्या संख्येने मंदिरात भाविक भक्त बंधू भगिनीं उपस्थित होते.