गडचिरोली:
अहेरी नगरपंचायत क्षेत्रात कित्येक प्रलंबीत विकासकामाचे भुमिपुजन माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.प्रभाक क्र १,६,७,९,११ व १५ येथील रस्ते,नाल्या व वींधन विहीरींच्या मागण्या बर्याच कालावधी पासुन प्रलंबीत होत्या. कामांना सुरुवात झाल्याने नागरीकांनी आनंद व्यक्त केला.
भूमिपूजन कार्यक्रमात कुमार अवधेशराव बाबा, गटनेत्या शालिनी पोहणेकर, पाणी पुरवठा सभापती विकास ऊईके,नगर सेविका सौ.सुनिता मंथनवार, नगरसेविका सौ.लक्ष्मी मद्दीवार,तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार, रवी नेलकुद्री,संजय पोहणेकर,राकेश कोसरे,विनोद जिल्लेवार,विकास तोडसाम,मयूर पिपरे गुड्डू ठाकरे,इ.पदाधिकारी व कार्यकर्ते ऊपस्थित होते.!