जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली, दैने नवे जिल्हाधिकारी

288

गडचिरोली, ता. ११ :

गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी हिंगोली येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची गडचिरोली जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना चांगलाच वेग आला होता. त्यांच्याच काळात सूरजागड लोहखाण आणि कोनसरी लोह प्रकल्पासह अनेक प्रकल्पांना गती मिळाली. नवे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडूनही जिल्हावासींच्या विकासाच्या अपेक्षा आहेत.