भाजप महिला आघाडी ची मागणी
गडचिरोली,
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जारावंडी या गावात पाच वर्षाच्या चिमुकलीवर आरोग्य केंद्रातील शिपाई संतोष नागोबा कोंडेकर याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना 1 मार्च ला घडली.सदर प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून त्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन गडचिरोली भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गीता हिंगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांचे कडे देण्यात आले. यावेळी भाजपच्या जिल्हा सचिव तसेच माजी जी.प. सभापती रंजिताताई कोडापे,वर्षा शेडमाके, सीमा कन्नमवार, त्रिशा डोईजड ,भूमिका बरडे , रोशनी राजुरकर व अन्य भाजप च्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.