चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशीच द्या

369

गडचिरोली, ता. १५ : एटापल्ली तालुक्यातील पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई संतोष नागोबा कोंडेकर या नराधमास फाशीच द्यावी, अशा मागणीचे निवेदन महिला समन्वय समितीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऱ्यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, एटापल्ली तालुक्यातील जारावांडी या गावात पाच वर्षांच्या चिमुकलीवर प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई संतोष नागोबा कोंडेकर याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना १ मार्च रोजी घडली. ही अतिशय घृणास्पद घटना असून हे प्रकरण जलदगती न्याालयात चालवून या नराधामास फाशीची शिक्षा द्यावी. हे निवेदन देताना महिला समन्वय समितीच्या जिल्हा संयोजिका माणिक ढोले, सहसंयोजिका उज्ज्वला वालोदे, यांच्यासह समन्वय समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.