गडचिरोली, ता. २९ : गडचिरोली विधानसभेतील चातगाव, दुधमाळा, गिलगाव, हेटी, मुरमाडी, सोडे या गावांमध्ये शिवसंकल्प अभियानाअंतर्गत सर्व योजनांची आढावा बैठक घेण्यात आली व जनसंपर्क साधण्यात आला.
शिवसेना संपर्कप्रमुख वर्षा मोरे (कुंभारे) यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली जिल्हा प्रमुख श्रीदेवी वरघंटीवार, उपजिल्हाप्रमुख अविनाश वरघंटीवार यांच्यासोबत धानोराच्या तालुकाप्रमुख मेघा कोसरे आदींनी दौरा करून गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व गावकऱ्यांन सोबत निवडणुकीबद्दल चर्चा करण्यात आली. अशा प्रकारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिला दौरा सुरू करण्यात आला.










