महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.श्री.अशोक नेते यांचे चामोर्शी येथे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करतांना आमदार डॉ. देवराव होळी.

66

आमदार डॉ. देवराव होळी.

गडचिरोलीदि.२९ मार्च २०२४

 

महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार श्री. अशोक महादेवराव नेते यांना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवारी मिळाल्याचे व तिसऱ्यांदा विजयी हॅट्रिक व्हावे यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आनंद द्विगुणित करत आमदार डॉ. देवराव होळी यांच्या चामोर्शी येथील निवास स्थानी परिवारांसह शाल श्रीफळ देऊन खा.अशोक नेते यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

 

भेटी दरम्यान खा.नेते व आमदार डॉ. होळी साहेबांनी भाजपा संघटनेबद्दल विचार मंथन सुद्धा यावेळी करण्यात आले.

 

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहत आशीर्वाद रुपी विश्वासाने पूर्ण शक्तीने, पूर्ण ताकदीने निर्धार करून विजय संकल्प आपलाच राहील अशा भावना यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शुभेच्छा देतांना व्यक्त केल्या.

यावेळी सोबत जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,सामाजिक नेते नंदुजी काबरा,जिल्हा सचिव दिलीप चलाख,जेष्ठ नेते जैराम चलाख, युवा नेते निखिल धोडरे,रामचंद्र वरवाडे, उपस्थित होते.