आधारविश्व फाऊंडेशन ही महिलांची सामाजिक संघटना विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून विविध सण, उत्सवांना सामाजिक कार्याची जोड दिली जाते.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दि. 25-3-2024 रोज सोमवारी निवासी मूक बधिर शाळा नवेगाव येथे आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे यांच्या नेतृत्वात रंगपंचमी चा कार्यक्रम घेण्यात आला.
कुणाचाही दोष नसताना काही मुले दिव्यांग म्हणून जन्म घेतात. शिक्षणासाठी ही मुले कुटुंबापासून दूर राहतात. सणासुदीला सुद्धा सुट्या नसल्यामुळे ही मुले घरी जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच अश्या मुलांना आपल्या आनंदातला थोडासा आनंद देता यावा यासाठी आधारविश्व फाऊंडेशनच्या सदस्या दरवर्षी अश्याच मुलांसोबत रंगपंचमीचा कार्यक्रम साजरा करतात.
यावर्षी निवासी मूक बधिर शाळेतील मुलामुलींना रंगीत टोप्या, गळ्यात गाठ्या टाकून गुलाल लाऊन त्यांच्यासोबत रंगोत्सव साजरा केला. बिस्किट ,चॉकलेट,नाश्ता तर कुणी स्वीट असे आणून त्यांच्यासोबत पंगतीत बसून आधारविश्व च्या सदस्यांनी नाश्ता चा आनंद घेतला. त्यानंतर सर्व सदस्यांनी या मुलांसोबत नाच गाणी, रंग उधळून मायेचा ओलावा दिला.कार्यक्रम आटोपल्यावर निरोप घेताना एक एक मुलं सर्वांच्या गळा भेट घेत होते.जीवनातला खरा आनंद घेण्यासाठी सर्वांनी आपल्या व्यस्त जीवनातून थोडासा वेळ काढून अशा मुलांना द्यावा हा संदेश आधारविश्व फाऊंडेशन ने या उपक्रमातून दिला. पुढल्या वर्षीही रंगपंचमीचा आनंद वाटून घ्यायला ,रंगाची उधळण करायला आधारविश्व ची टीम नक्की येईल असे आश्वासन देऊन हसऱ्या चेहऱ्याने सर्वांचा निरोप घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे, उपाध्यक्षा विना जंबेवार, सचिव सुनीता साळवे, सदस्या विजया मने, मीरा कोलते , सुलभा धामोडे, सीमा कन्नमवार, रोशनी राजुरकर, सरोज कन्नमवार, सुशील हिंगे,विजय साळवे, अनिल धामोडे ,राहुल कन्नमवार, मनोज राजूरकर, विठ्ठल कन्नमवार आदिनी परिश्रम घेतले.