महायुतीचेअधिकृत उमेदवार तथा खासदार अशोकजी नेते यांचा माजी आमदार हरिरामजी वरखडे यांनी आरमोरी येथे केला सत्कार .

114

गडचिरोली दि :-३० मार्च २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आरमोरी येथील माजी आमदार आणि राष्ट्रवादी पार्टीचे जेष्ठ नेते श्री हरिरामजी वरखडे गुरुजी यांच्या निवासस्थानी आज दिनांक ३० मार्च २०२४ रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोक जी नेते यांनी सदिच्छा भेट दिली असता यावेळी माजी आमदार हरिरामजी वरखडे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन मानसन्माने सत्कार केला.

 

याप्रसंगी अशोक जी नेते यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाशजी अर्जुनवार,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप जी मोटवानी, आरमोरी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमिंतजी लालानी ,कार्याध्यक्ष सुनील नंदनवार ,युवा नेते गगन दिलीप मोटवानी, आणि इतरही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान आपण तन-मन-धनाने महायुतीचा प्रचार करणार असून नक्कीच महायुतीचे उमेदवार श्री अशोकजी नेते यांना विजयी करणारचं असे विश्वासाने पाठिंबा देत माजी आमदार हरिरामजी वरखडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

तसेच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा एक मताने श्री अशोकजी नेते यांच्या प्रचाराला लागणार अशी यावेळी त्यांनी हमी दिली.