चामोर्शी येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी शहरात माता निर्मला माँ या अधिष्ठान ध्यान केंद्र कार्यक्रमाला उपस्थित राहून दर्शन घेतले.

68

गडचिरोली: दि.३१ मार्च २०२४

 

चामोर्शी:- महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार अशोक जी नेते व आमदार डॉ. देवरावजी होळी,डॉ. मिलिंद नरोटे यांनी चामोर्शी येथील सहयोग ध्यान केंद्राला भेट व उपस्थित राहून माता निर्मला माँ चे पूजा पाठ करून दर्शन घेतले.यावेळी चामोर्शी वासिय जनतेच्या समस्या जाणून घेऊन चर्चा केली.

यावेळी या सहयोग ध्यान केंद्राच्या भेटी दरम्यान खा.नेते यांनी बोलतांना म्हणाले मला सेवा करण्यासाठी तिसऱ्यांदा विजय करा.यासाठी सर्व जनतेचे सहकार्य,व आपली साथ हवी.

चामोर्शी शहरातील स्व.स्वप्निल वरघंटे हे स्वर्गवासी झाल्याने माझा एक उजवा हात व जवळचा सहकारी गेला.मि चामोर्शी आल्यावर त्यांची नेहमी आठवण येते.अशी खंत व्यक्त करत शहरातील व इतरही ग्रामीण भागातील काही अडीअडचणी असल्या तर नेहमीच माझ्यापर्यंत पोहोचवायच अहोरात्र जनतेच्या सेवेत राहायचा याची प्रचिती त्यांच्या अंत्यविधीच्या यात्रेला दहा हजार लोकांचा जनसमुदायातून पाहायला मिळाली.त्याच्याच प्रयत्नाने माता निर्मला माँ सहयोग ध्यान केंद्राला १० लक्ष रुपयाचा निधी दिला गेला हा कार्यक्रम चालुआहे त्याचाच श्रेय व सिहाचा वाटा आहे.

या ठिकाणी निर्मला माता चा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला अशा कार्यक्रमाची आज जगाला व देशाला गरज आहेे असे खा.अशोक नेते यांनी प्रतिपादन केले.

यावेळी आमदार डॉ. देवराव होळी व डॉ. मिलिंद नरोटे यांनी बोलतांना तिसऱ्यांदा नेते साहेबांनाच बहुमताने विजयी करा असे सुचक व्यक्तव्य यावेळी केले.

 

या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,अरून हरडे,नंदुजी काबरा,तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर,शहराध्यक्ष सोपान नैताम, जिल्हा सचिव दिलीप चलाख,जेष्ठ नेते जैराम चलाख,सुनिलजी दिक्षीत साहेब, नरेश अल्लसावार,रमेश अधिकारी तसेच नागरिक बंधू भगिनींच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.