- गडचिरोली, ता. २ : शाससकीय कामात अडथळा निर्माण करुन, किरकोळ जखमी करणाऱ्या दोन महिला आरोपींना २ महिने कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास १० दिवस वाढीव शिक्षा न्यायालयाने सूनावली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, पोलिस स्टेशन देसाईगंज येथील फिर्यादी महिला पोलिस उपनिरीक्षक. सोनम नाईक या आपल्या हद्दीतील महिला पोलिस उमहानिरीक्षक सुजाता भोपळे व पोलिस स्टेशन स्टाफसह देसाईगंज शहरात गस्त घालत असताना गांधी वॉर्ड देसाईगंज येथील आरोपी रजनी रामचंद्र आत्राम वय ४७ वर्षे, रा. गांधी वॉर्ड देसाईगंज ही तिच्या राहत्या घरी अवैधरीत्या देशी- विदेशी दारुची विक्री करते,अशी गोपनीय सुत्रांकडुन माहिती मिळाली. त्या रजनी आत्राम यांच्या घराची झ्डती घेत असताना आरोपी शीतल रामचंद्र आत्राम, वय २६ वर्षे रा. गांधी वॉर्ड, देसाईगंज हिने अरेरावी केली.
माझ्या आईला दोन मुली पोसायच्या आहेत म्हणुन माझी आई दारू विकते, हे माझे घर आहे तुमचे पोलिस स्टेशन नाही असे म्हणून एकाएकी पोलिस उपनिरीक्षक सोनम नाईक यांच्या अंगावार येऊन दोन्ही हात पकडुन शोकेस आलमारीकडे ढकलत नेले व मान खाली दाबुन मानेवर बुक्यांनी मारले. त्यावेळी सोबत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक सुजाता भोपळे यांचेही दोन्ही हात पकडुन खाली ढकलून दिले. तसेच आरडाओरड करुन अश्लिल शब्दात शिवीगाळ केली. यासंदर्भात देसाईगंज पोलिस स्टेशन येथे दोन्ही आरोपीविरुद्ध २८ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २ वा अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादी पंच व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन १ एप्रिल २०२४ रोजी आरोपी आरोपी रजनी आत्राम व शीतल आत्राम या दोघींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी दोषी ठरवून २ महिने कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १० दिवस वाढीव शिक्षा ठोठावली.
——————-.