ना सुधीर भाऊ मुनगंटीवार व खा अशोकजी नेतेंच्या विजयासाठी आ. डॉ. देवरावजी होळी यांचे महादेवाला विनवणी.

81
  • वनमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मार्कंडा देवस्थान येथे मार्कंडेश्वराचे पूजन

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक ३ जून 

उद्या होणाऱ्या मतदान मोजणीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राज्याचे वन मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार व गडचिरोलीचे खासदार अशोकभाऊ नेते यांना विजय मिळावा यासाठी ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मार्कंडा देवस्थान येथे पूजा अर्चा करून महादेवाला विनवणी केली.

 

आज मतमोजणीच्या पूर्वसंध्येला राज्याचे वन व सांस्कृतिक विभागांचे मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मार्कंडा देवस्थान येथे आगमन झाले असता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महादेवाचे दर्शन घेत विजयासाठी महादेवाला साकडे घातले.