नागपूरच्या महिला मोर्चाच्या संघटनात्मक बैठकीला जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांची उपस्थिती

68

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १९ : पूर्व व पश्चिम विदर्भ महिला मोर्चा संघटनात्मक बैठक महिला मोर्चा प्रदेशध्यक्षा चित्रा वाघ यांच्या अध्यक्षतेत नागपुरातील मंगलम कार्यालय पार पडली. या बैठकीला भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांची उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऐक्याने, निष्ठेने काम करूनसुद्धा भारतीय जनता पक्षाला विदर्भामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. परंतु महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता आगामी होणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमताने सत्तेमध्ये आणण्याचा संकल्प करावा. पूर्ण विश्वासाने सर्वांच्या सहकार्याने काम करू, असा विश्वास महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बैठकीत व्यक्त केला. याप्रसंगी पूर्व व पश्चिम विदर्भातील महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, जिल्हा महामंत्री, जिल्हा उपाध्यक्ष व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————————–