मान्सून कालावधीत सतर्कता बाळगा

71
  • जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली,दि.18(जिमाका): मान्सून कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द प्रकल्प, अप्पर वर्धा प्रकल्प, निम्न वर्धा प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प, येलंमपल्ली प्रकल्प, पार्वती बॅरेज, सरस्वती बॅरेज व मेडीगड्डा बॅरेज तसेच गावानजीकचे छोटे नाले, आढे यांना पाणी पातळीत वाढ होऊन गडचिरोली जिल्ह्यातील नदीकिनाऱ्यावरील पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे नदीकिनाऱ्यावरील गावांतील नागरिकांनी तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या हौशी पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगावी. पर्यटकांनी सेल्फीचा मोह टाळावा. तसेच नदी/ नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये. निर्माणाधिन इमारती, मोकळी जागा, किंवा शेतामधील डबके, खड्डे, इत्यादी ठिकाणी लहान मुले खेळण्याच्या ओघात दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता मान्सून काळात अशा ठिकाणांजवळ उचित सतर्कता बाळगावी. विशेषत: लहान मुलांची उचित काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विजय भाकरे यांनी केले आहे.