ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १९ : १९ जूनपासून पोलिस शिपाई भरती सुरू झाली असून या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची निवासाची व भोजनाची प्रचंड गैरसोय होतात.म्हणून या वेळेच तशी गैरसोय होऊ नये .त्याकरिता आमदार डाॅ. देवराव होळी या उमेदवारांच्या मदतीला धावून आले. स्थानिक पटेल मंगल कार्यालयात त्यांनी उमेदवारांच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था २० जूनपासून सुरू होणार आहे.
गडचिरोली जिल्हा केंद्रावर १९ जूनपासून पोलिस भरतीची मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात येत असून या मैदान चाचणीला बाहेरून येणाऱ्या उमेदवारांकरिता आमदार डॉ. देवराव होळी यांनी राहण्याची व सायंकाळी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. गडचिरोलीतील चंद्रपूर मार्गावरील पटेल मंगल कार्यालयात २० जूनपासून ही व्यवस्था सुरू होणार आहे. गरीब, गरजू उमेदवारांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आपल्या मैदान चाचणीच्या दिनांकासह नाव नोंदवून घ्यावे, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे. उमेदवारांनी येताना आपले कपडे, अंथरूण-पांघरूण ,टाॅवेल, ब्रश, साबुन आदी दैनंदिन जीवनोपयोगी साहित्य सोबत आणावे. हॉल तिकीटची झेरॉक्स, ओळख पत्र( आधारकार्ड झेरॉक्स सोबत आणावी. उमेदवारांनी सूरज मस्के आमदार जनसंपर्क कार्यालयीन सहकारी – 9022163191, राजू शेरकी भाजपा शहर उपाध्यक्ष – 9579474414, हर्षल गेडाम भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष -8668403959, तुषार सातपुते पी ए – 94238 41481 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









