सिंधी समाजाच्या लोकांना लिजवर मिळणार पट्टे

64
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • देसाईगंज, ता. २३ : जेसा मोटवानी यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे आता राज्यातील हजारो सिंधी बांधवांना लिजवर पट्टे मिळणार आहेत.
  • गुरुवार (ता. २०) महसूल व वनविभागाचे प्रधान सचिव राजेश मीना यांच्या कार्यालयात सिंधी समाजाच्या पट्ट्यांबाबत बैठक झाली. मागील अनेक वर्षांपासून राज्यातील सिधी समाजाच्या पट्ट्यांचा प्रश्न प्रलंबीत होता. या बैठकीमध्ये हा प्रश्न निकाली काढण्यात आला. तसेच देसाईगंज शहरातील ६४ रहिवासी प्लॉट व बाजारपेठेतील १९ दुकानांसुद्धा पट्टे मिळणार आहेत.याकरिता सिंधी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष जेसा मोटवानी यांच्यासह काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा पाठपुरावा केला होता. जेसा मोटवानी यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही समस्या मार्गी लावल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
  • ——————————————