ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ३ : काॅंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसद भावनामध्ये देशातील पवित्र हिंदू धर्माला हिंसक म्हणून वादग्रस्त विधान केले व हिंदू २४ तास हिंसा करत असतात, असे विधान करून समस्त हिंदू समाजाचा अपमान केला, असा आरोप करत भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने राहुल गांधी यांच्या विरोधात बुधवारी ३ जुलै रोजी निषेध आंदोलन केले.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष व विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने इंदिरा गांधी चौक येथे राहुल गांधी यांच्या विरोधात राहुल गांधी माफी मांगो, हिंदू का अपमान नही सहेगा हिंदुस्तान, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद व हिंदू विरोधी काँग्रेस, भारत माता की जय, जय जय श्रीराम, असे घोषणा देत राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव व ज्येष्ठ नेते रमेश भुरसे,जिल्हा महामंत्री योगीता पिपरे, डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, कोषाध्यक्ष गजानन येंगधलवार, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर, वर्षा शेडमाके, रंजिता कोडापे, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार, प्रतिमा सोनवाणे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महामंत्री बंडू झाडे, रमेश नैताम, शहर महामंत्री नरेश हजारे, केशव निंबोड, विवेक बैस, प्रशांत भृगुवार, हर्षल गेडाम, मधुकर भांडेकर, प्रशांत अल्पटवार, नीतेश खडसे, बालाजी भांडेकर, विशाल हरडे, पवन वासेकर, देवाजी लाटकर, राजू शेरकी, आकाश राऊत, महिला मोर्चा शहराध्यक्ष कविता उरकुडे, प्रतिभा चौधरी, महामंत्री पलवी बारापात्रे, वैष्णवी नैताम, अर्चना निंबोड, भारतीय जनता पक्ष व विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.