राष्ट्रीय महामंत्री तथा मा.खा. अशोक नेते यांचीही उपस्थिती…
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संबंधित बालेवाडी स्टेडियम पुणे येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली.
या बैठकीत भाजपची भूमिका, महत्वाचे मुद्दे आणि रणनिती ठरविण्यासंदर्भात मंथन करण्यात आले.
या बैठकीला भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते हेसुद्धा उपस्थित होते.
या बैठकीला उपस्थिती राहुन लोकसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या भेट झाली त्यावेळी माजी खासदार अशोकजी नेते यांच्यासह वि.प. आमदार मान.परिणयजी फुके,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,आमदार डॉ.देवरावजी होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव जी कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा संघटन मंत्री संजय गजपुरे,माजी सभापती संतोष भाऊ तंगडपल्लीवार,माजी सभापती नागराजभाऊ गेडाम, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर,तालुकाध्यक्षा लताताई पुन्घाटे, ता.महामंत्री सतिश बोम्मावार,एस.टी.मोर्चाचे कार्यालय प्रमुख नितीनभाऊ गडकरी, शहराध्यक्ष सारंग साळवे,सोशल मिडिया चे राकेश कोनबतुलवार,तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पक्षबांधणीसोबत विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची भूमिका, महायुतीमधील घटक पक्षांशी समन्वय ठेवत विजयाचे गणित कसे अधिक सोपे करता येईल, यावर या बैठकीत वरिष्ठांनी मार्गदर्शन केले.