भाजपाने आमदार डॉ. देवराव होळी यांना तिकीट द्यावे निखिल भारत बंगाली समन्वय समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक हलदर  यांची मागणी

75
  1. मागील ५० वर्षात कोणत्याही आमदाराने न केलेली कामे आमदार होळी यांनी मागील १० वर्षात करून दाखवली

 

निखिल भारत बंगाली समन्वय समिती महाराष्ट्र प्रदेशाच्या जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे सुभाषग्राम येथे आयोजन

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक ४ ऑगस्ट २०२४ सुभाषग्राम

 

गडचिरोलीचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या पाठीमागे बंगाली समाज खंबीरपणे उभा असून जिंकून येण्याची त्यांची क्षमता आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या २०२४ च्या निवडणुकीकरिता विद्यमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांनाच तिकीट द्यावे अशी मागणी निखिल भारत बंगाली समन्वय समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक हालदार यांनी सुभाषग्राम येथील समितीच्या जिल्हा कार्यकर्ता संमेलनाच्या प्रसंगी केले.

 

निखिल भारत बंगाली समन्वय समिती महाराष्ट्र प्रदेशाच्या जिल्हा कार्यकर्ता संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून प्रदेशाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर रणजीत मंडल प्रदेश सचिव प्राचार्य बिधान व्यापारी , तर सतीश रॉय प्रदेश कार्याध्यक्ष, शैलेंद्र खराती राष्ट्रीय सदस्य, डॉ.मनोरंजन मंडल प्रदेश सल्लागार, रवींद्र शहा जिल्हाध्यक्ष, कृष्णपद मंडल सरपंच सुभाष ग्राम, प्रल्हाद मंडल प्रदेश कोषाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष विधान वैद्य, सुभाष सरकार , स्वरजीत विश्वास ,प्रदेश सहसचिव सुरेश शहा ,कमलेश गायन ,दीपक रॉय, प्रा.शैलेंद्र मलिक ,समीर अधिकारी, रनेन मंडल ,पिंटू अधिकारी, निखिल हालदार, जुगल सरकार, बादशहा मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आमदार डॉक्टर देवराव होळी सतत बंगाली समाजाच्या हितासाठी लढा देत आहेत. मागील ५० वर्षात कोणत्याही आमदाराने न केलेली कामे त्यांनी मागील १० वर्षात करून दाखवलेली आहेत. बंगाली समाजाला प्रॉपर्टी कार्ड, अतिक्रमित जमिनीच्या मोजणीसाठी ९७ लक्ष रुपयाचा निधी, बंगाली विद्यार्थ्यांना भाषेतून शिक्षणासाठी पुस्तके, बंगाली विषय शिक्षकांच्या नियुक्त्या, बंगाली समाजाचे जातीगत सर्वेक्षण , बंगाली समाजाला पोलीस भरती मध्ये संधी, मिळवून देण्याचे यशस्वी प्रयत्न त्यांनी केले. बंगाली समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभागी असून बंगाली समाजाचे मागण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत आहेत त्यामुळे संपुर्ण बंगाली समाज आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्यात असून त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही उमेदवार गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विजय मिळवू शकत नाही त्यामुळे भाजपाचे हात मजबूत करण्यासाठी आमदार डॉक्टर देवराव होळी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या संमेलनाच्या प्रसंगी बंगाली नेते दीपक हलदर यांनी केली आहे.