ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ४ : कोरची तालुक्यातील एका गर्भवती महिलेला खाटेची कावड करून उपचारासाठी नेण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून अंदाजे २० किलोमीटर अंतरावरील असलेल्या केरामीटोला येथील गरोदर महिला रोशनी श्यामसाय कमरो (वय २२) या महिलेला खाटेवर ठेवून केरामीटोलापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या चरवीदंड येथे नेण्यात आले.
पाण्याने भरलेल्या नाल्यातून या गर्भवती महिलेला खाटेची कावड करून नेण्यात आले. चरवीदंड येथून एका खासगी वाहनाने कोरची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून गरोदर मातेला सातवा महिना सुरू आहे. तिला अचानक प्रसव वेदना होत असल्यामुळे तिला गडचिरोली येथील महिला रुग्णालयात रेफर करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते यांचा प्रश्न एरणीवर आला असून यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललाय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्य म्हणजे केरामीटोला या गावाला जाण्याकरिता रस्तासुद्धा नाही.