आमदार डॉ देवरावजी होळी यांनी सर्वच लाडक्या बहिणींचे अर्ज केले मंजूर.

119

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ५९ हजार अर्ज बैठकीत मंजूर*

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक ६ ऑगस्ट २०२४ गडचिरोली

*राज्यातील महायुतीच्या सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्राप्त अर्जाना तातडीनं मंजुरी देण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्र समिती बैठकीमध्ये प्राप्त सर्वच अर्ज मंजूर करण्याचा निर्णय समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेऊन लाडक्या बहिणींना भेट दिली आहे.*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची बैठक गडचिरोली पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाली या सभेमध्ये १ जुलै ते ६ ऑगस्ट पर्यंत प्राप्त झालेल्या १ लाख ५६ हजार २३६ अर्जावर सविस्तर चर्चा झाली. त्यातील मान्यता असलेली १ लाख ४९ हजार ३३६ अर्ज मंजूर करण्यात आली. परंतु उर्वरित अर्ज जरी मंजूर झालेली नसली तरी त्यातील काही तांत्रिक अडचणी दूर करून तेही मंजूर करण्यात येतील असा सर्वच अर्ज मंजुर करण्याचा आदेश या बैठकीच्या प्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपस्थित विधानसभा समितीच्या अधिकाऱ्यांना दिला.

 

बैठकीला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बालविकास अधिकारी,तहसीलदार, चामोर्शी , धानोरा व गडचिरोली, संवर्ग विकास अधिकारी धानोरा, चामोर्शी व गडचिरोली बालविकास प्रकल्प अधिकारी धानोरा, चामोर्शी व गडचिरोली, गटविकास अधिकारी धानोरा, गडचिरोली व चामोर्शी,मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली मुख्याधिकारी नगरपंचायत धानोरा व चामोर्शी व गडचिरोली,

बालविकास प्रकल्प अधिकारी चामोर्शी, धानोरा व गडचिरोली यांचे सह संबंध अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.