पोलिसांनी कोंबड बाजारावर घातली धाड; २१ जुगारी अटकेत

62

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २६ : मागील काही दिवसापासून सर्रासपणे सुरू असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकून पोलिसांनी २१ आरोपींना अटक केली. तसेच तब्बल १५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मुलचेरा तालुक्यातील चिचेला जंगल परिसरात मुलचेराचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलचेरा तालुक्यातील चिचेला ते आपापल्ली मार्गावरील जंगल परिसरात कोंबड बाजारावर मोठ्या प्रमाणात जुगार चालत असल्याची माहिती मिळताच मुलचेराचे पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी रविवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान धाड टाकून सुमारे १५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच २१ आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये भाऊजी शिवराम वाघमारे रा. सिंगनपेठ ता. अहेरी, सागर प्रकाश वाकुडकर रा. चांदेश्वर ता. चामोर्शी, ईश्वर नानाजी सडमेक रा. गोमणी ता. मुलचेरा, राजेंद्र व्यंकया तानसेन रा. येचली ता. भामरागड, आदर्श निलेश खोबरे रा. वेलगुर ता. अहेरी, राकेश भिमा आलाम रा. दिना चेरपली ता. अहेरी, प्रसनजित प्रशांतो मंडल रा. भवानीपुर ता. मुलचेरा, कमलेश सुशांत मंडल रा. भवानीपुर ता. मुलचेरा, सुनिल सुधाकर निकेसर रा. कोडीगाव ता. मुलचेरा, संतोष शंकर कोटरंगे रा. नवेगाव ता. अहेरी, मोरेश्वर गिरमाजी तुंकलवार रा. चिचेला ता. मुलचेरा, साईनाथ शंकर कडते रा. कोडीगाव, ता. मुलचेरा, अनिकेत राजु दुर्गे कामरा. गोमणी ता. मुलचेरा, अशोक भिमराव नैताम रा. आपापली ता. अहेरी, रामकृष्ण सिडाम दास रा. भगतनगर ता. मुलचेरा, परितोष ब्रोजेन बिश्वास रा. खुदीरामपल्ली ता. मुलचेरा, रघुनाथ दशरथ नैताम रा. बंदुकपल्ली ता. मुलचेरा, बुधाजी गंगाराम येरमे रा. चिचेला ता. मुलचेरा, भुजंगराव मुसली मडावी रा. बंदुकपल्ली ता. मुलचेरा, सोमा शिवा आत्राम रा. लगाम ता. अहेरी, गंगाराम रामया डबले रा. आपापल्ली ता. अहेरी यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून ३० नग मोटारसायकल (एकूण किंमत १५ लाख ३० हजार), १३ नग मोबाईल फोन (एकूण किंमत ४५ हजार), रोख रक्कम १४ हजार ७५०,५ नग जिवंत कोंबडे (किंमत १९५०), लोकांडी धारदार कात्या २० नग (एकूण किंमत १ हजार रुपये), मोजमाप काटा १ नग (किंमत ५०० रुपये) असे एकूण १५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मुलचेराचे ठाणेदार म्हणून महेश विधाते यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून अवघ्या पंधरा दिवसांतच त्यांनी कोंबडा बाजारावर मोठी कारवाई केली. त्यामुळे दारू व्यावसायिक, सट्टापट्टीधारकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांना वचक बसेल अशी अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे. विशेष म्हणजे या कारवाईवरून या भागात मागील काही दिवसापासून किरकोळ संघटित टोळ्या तयार करून अनधिकृत सट्टा व जुगाराचे गुन्हेगारी कृत्य करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सोमवार २६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती येथील पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी दिली आहे.