परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अल्पसंख्यांक उमेदवाराकडून अर्ज आमंत्रित

54
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली,(जिमाका)दि.02: अल्पसंख्यांक विकास विभाग अंतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४-२०२५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेच्या अटी व शर्ती- विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदयातील व महाराष्ट्र राज्याया रहिवासी असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाखापेक्षा जास्त नसावे (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रीत वार्षीक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडीलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडीलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. पीएचडीसाठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षापेक्षा कमी नसावा. पदव्युत्तर पदवीसाठी ३ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो. तथापि कोणत्याही परिस्थितीत २ वर्षापेक्षा कमी नसावा. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल. एका वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटूंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतीम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटूंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा, परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत (QS World University Rank) २०० च्या आत असावी. शासनाने सर्व विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषामध्ये समानता आणण्या करीता सर्वकष धोरण ठरविले आहे. त्यामुळे नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या सर्वकष नियमावलीचे सर्व विभागांनी पालन करणे अपेक्षित असल्याने नियोजन विभागाने घेतलेला शासन निर्णय अंतिम असेल. त्यानुषंगाने नमूद करण्यात येते की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बांधकामे) कार्यासनामार्फत दि.३०.१०.२०२३ रोजी या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्या संदर्भात दि.९.११.२०२३ रोजी शासन शुध्दीपत्रक निर्गमित केलेले आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांस पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणीक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे. शासन निर्णय क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२३.११.२०२३ मधील अटी शर्ती लागू राहतील. शासन पुरकपत्र क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२०.६.२०२४मधील अटी शर्ती लागू राहतील. शासन निर्णय क्र.सान्यावि-२०२४/प्र.क्र.७७/बांधकामे, दि.२५.७.२०२४ मधील अटी शर्ती लागू राहतील. अटी व शर्ती ह्या सविस्तर जाहिराती प्रमाणे व शासन निर्णयानुसार लागू राहतील. सदरील वेबसाईट वरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. ०६/०९/२०२४ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावा. ऑनलाईन पोर्टल सुरु झाल्यास त्याबाबत माहिती देण्यात येईल. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर जाऊन भेट द्यावी.
  • योजनेतील लाभाचे स्वरुप – परदेशातील शैक्षणिक संस्थेने Offer Letter मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गानी Economy Class विमान प्रवास भाडे, (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तीक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शूल्क भरणा पावती, प्रवासाचे मुळ तिकीट, मुळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रवासाचे तिकीट इ. तपासून विदयार्थ्याच्या बैंक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केली जाईल. विदयार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी USD१५४०० तर युकेसाठी GBP९९०० इतक्या रक्कमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधित विदयार्थ्यांच्या परदेशातील वैयक्तीक खात्यामध्ये जमा केला जाईल. विद्यार्थ्यास खालील बाबींवर होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यु.एस. ए. व इतर देशांसाठी (यु.के वगळून) १५०० यु. एस. डॉलर आणि यु.के. साठी १,१०० जी.बी.पी इतका निर्वाह भत्ता/ इतर खर्च/आकस्मिक खर्च म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.